अनिल दामले - लेख सूची

रानवस्ती

मी अनिल दामले. पांढरपेशा शहरी. जन्म मुंबईतला. पुण्यात वाढलो. शिकलो. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीच्या दामल्यांचा मी नातू. सिने सृष्टीच्या आणि शहराच्या झगमगाटांत वावरलो. त्याचबरोबर रानोमाळ हिंडायचो. दऱ्याखोऱ्या, गड, किल्ले, वने पाहिली. शेतीवाडीवर राहिलो. झाडझाडोरा, नदी, तळी, ऊन, वारा, पावसाचे शिंतोडे, पक्ष्यांचे बोल. ह्या सगळ्या निसर्गरूपांवर भाळलो. निसर्गसान्निध्यात राहावे, मनसोक्त, मनमुराद आयुष्य जगावे. शहरी चाकोरी …